एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

पंतप्रधान मोदी खोमेनी आणि हिटलरचे मिश्रण; सामनातून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Saamana Editorial: पंतप्रधान मोदी हे खोमेनी आणि हिटलरचे मिश्रण आहेत, मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू देव लागतात, सामनातून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Saamana Editorial on Karnataka Elections: आजच्या सामनातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. नऊ वर्ष राज्य करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवं. निर्भय व्हावं लागेल, असं आवाहन आजच्या सामनातून करण्यात आलं आहे. 

या देशात नवे हिंदुत्वाचे वातावरण तयार करण्यात आलं असून त्यातून दोन खोमेनी निर्माण झाले आहेत. देश इराण, सीरिया आणि अफगाणिस्तानच्या पद्धतीनं चालवला जाईल. पंतप्रधानांनी प्रचारात धर्म आणला, शासकीय यंत्रणा वापरली. भाजपने देशभरचे कॅबिनेट कर्नाटकात उतरवले, पण त्यांचा मुख्य भर 'हिंदू- मुसलमान' यावरच आहे, असं म्हणत सामनाच्या रोखठोक सदरातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. 

मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासूनबजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचं आणि निवडणुका जिंकायच्या आहेत. मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल. पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवे. निर्भय व्हावे लागेल, असं सामनाच्या रोखठोक सदरात म्हटलं आहे. 

वाचा रोखठोक : कर्नाटकात आता 'बजरंगबली' अवतरले! विकास पुरुष मोदींचे अपयश

10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होत आहे. दक्षिणेतल्या या एकमेव राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता आता डळमळीत होताना दिसत आहे. बुधवारी मी बेळगावात होतो. विमानतळावर उतरलो तेव्हा भारतीय वायु दलाचे विमान उभे होते. 'पंतप्रधान मोदी येथे प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळे विमानतळच 'एस.पी.जी.'च्या ताब्यात आहे,' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान पदावरील व्यक्ती सर्व सरकारी लवाजमा घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी उतरली. पंतप्रधान म्हणून त्यांना राजकीय प्रचारासाठी सर्व सरकारी सुविधा मिळतात. तो कोट्यवधींचा खर्च पक्षाच्या व उमेदवारांच्या खर्चात धरला जात नाही. मात्र विरोधकांना पै पैचा हिशेब द्यावा लागतो. पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या प्रचारात यावेळी बजरंगबलीस उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या व भाजपसाठी मतदानाचे बटन दाबा. हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली. इथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण कॅबिनेट सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहे. पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले. श्री. अमित शहा म्हणाले, 'कर्नाटकात भाजप जिंकला नाहीतर दंगली होतील.' देशात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे व ती तशीच ठेवली जाईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 'शुद्ध' हिंदुहृदयसम्राट होते. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारात भेसळ नव्हती. त्यावेळी धर्मांध खोमेनी याने लोकशाहीवादी राजवट हटवून इराणची सूत्रे हाती घेतली व आधुनिकतेकडे निघालेल्या इराणच्या विकासात खीळ घातली. धर्माच्या बेड्यांत इराणला पुन्हा जखडले. बाळासाहेब ठाकरे यांना मी तेव्हा खोमेनीबद्दल मत विचारले. बाळासाहेब ताडकन म्हणाले, 'मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही. अजिबात नाही, पण आज देशात जे नव हिंदुत्वाचे (उद्धव ठाकरे यांच्या भाषेत गोमूत्रधारी हिंदुत्व) वातावरण निर्माण केले आहे, त्यामधून देशात दोन खोमेनी निर्माण झालेच आहेत व त्यातून असंख्य खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया, अफगणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल.

सत्यपाल मलिक

देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत श्री. सत्यपाल मलिक यांची भेट 27 तारखेस घेतली. दिल्लीतील आर. के. पुरम भागातील एका हाऊसिंग सोसायटीत भाड्याच्या घरात ते राहतात. एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे त्यांचे जगणे आहे. जम्मू-कश्मीरसह चार राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले. मोदी सरकारने त्यांना जम्मू-कश्मीरला नेमले व आता 'पुलवामा' जवान हत्याकांडाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित करताच, 'श्री. मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत.' असे भाजपचे लोक बोलू लागले. हे गैर आहे. श्री. अमित शहा यांनी 370 कलम हटवले तेव्हा मलिक हेच राज्यपाल होते. म्हणजे मोदी यांचे ते विश्वासू होते. श्री. मलिक यांची प्रकृती त्या दिवशी बरी नव्हती व पायाच्या दुखापतीमुळे ते व्हीलचेअरवर होते. त्याच अवस्थेत ते काही तासांपूर्वी जंतरमंतर रोडवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटून आले. सत्यपाल मलिक यांचे म्हणणे असे की, 'देशात हुकूमशाही सुरू झाली आहे व सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे.'
'तुमच्या मागे तपास यंत्रणा लावू शकतात.' मी.
'मी घाबरत नाही. मी समाजवादी विचारांचा कडवट लोहियावादी आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही.' श्री. मलिक.
'2024 ला काय होईल?'
'एकासमोर एक उमेदवार हे सूत्र मान्य झाले तर मोदींचा दारुण पराभव होईल.' मलिक.
'आपण फक्त दिल्ली आणि हरयाणाच्या परिसरातच फिरताय.'
'नाही. मी संपूर्ण देशात जाणार आहे. मला फिरण्यापासून आणि बोलण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. संविधानाच्या रक्षणासाठी बाहेर पडावे लागेल.' मालिक.
श्री. मलिक यांच्याशी इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. लवकरच महाराष्ट्रात येऊ, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली ती महत्त्वाची. सत्यपाल मलिक यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका पार पाडावी, असे काही जणांना वाटते. पण देशातल्या विरोधी पक्षांना कुणाचेही एकछत्री नेतृत्व नको. सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारला सरळ अंगावरच घेतले आहे. ते हिमतीचे आहेत. शेतकरी व जाट समाजाचे ते नेते आहेत. जाट हा लढवय्या समाज आहे. 'मला काही केले तर माझा समाज स्वस्थ बसणार नाही हे केंद्र सरकारला माहीत आहे,' असे श्री. मलिक म्हणाले. मलिक यांना जम्मू-कश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांना सरकारने सुरक्षा देणे गरजेचे होते. मात्र एक साधा फौजदार त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. पण सत्यपाल मलिक लढत आहेत, संविधान वाचविण्यासाठी.

पक्ष फोडणे सोपे!

आज पक्ष फोडणे व त्यातून सत्ता आणणे हे मोदी-राज्यात सोपे झाले. कारण निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था त्यांच्या दिमतीला आहेत. 'निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर अन्याय केला,' असे श्री. सत्यपाल मलिक म्हणाले. राजकीय पक्षांना टिकू द्यायचे नाही व सर्व सत्ता एका दोघांकडे असावी हा विचार म्हणजेच घोटाळा आहे. देशात गवतासारख्या वाढणाऱ्या आणि फुटणाऱ्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तावडीतून देशाला सोडविण्याची गरज असताना पंतप्रधान मोदी या फोडाफोडीस उत्तेजन देत आहेत. डॉ. आंबेडकर यांनी भारतीय घटनेबद्दल सांगितले होते, 'घटना दुटप्पीपणा करणार नाही. Politicians can be wild! राजकारणी बिघडतील व त्यातून सगळे बिघडेल. डॉ. आंबेडकरांचे हे म्हणणे मोदी व शहा यांनी सत्य ठरवले आहे. धर्माचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे. सरकारला अडचणीचे ठरणारे निर्णय सुप्रीम कोर्ट घेत नाही व तारखांची शर्यत सुरूच ठेवते. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका रोखण्याचे कारण नव्हते व कोर्ट निवडणुका घेऊ देत नाही. हे सरकारला व भाजपला हवेच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर गेली 15 वर्षें तारखांशिवाय काहीच घडत नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निर्णय अधांतरी आहे. सर्व काही घटनेनुसार होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. श्री. राहुल गांधी यांनी मोदींची बदनामी केली या सबबीखाली त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द केली. त्यांचे घर रिकामे केले. त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला. फाशीची शिक्षा स्थगित होते. गौतम अदानीवरील आरोपांची चौकशी होत नाही. खुनी-दरोडेखोर लोकशाहीच्या मंदिरात उजळ माथ्याने वावरत आहेत. पण राहुल गांधींना एका क्षुल्लक प्रकरणात दिलासा द्यायला गुजरातचे न्यायालय तयार नाही. ही एक प्रकारची दहशत आहे. घटना नव्हे तर man can be wild! डॉ. आंबेडकरांचे सांगणे अशा वेळेला सत्य ठरते. संसदीय लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही चालते आणि हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड चालवले जाते. सामान्य मतदारांनी विचार करण्याचा हा काळ आहे. आपण सार्वभौम आहोत. इतका गैरसमज जरी सध्या दूर झाला तरी पुरे आहे!

नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. या एकाच विचाराने लोकांनी आता एकवटायला हवे. निर्भय व्हायला हवे!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget