ब्रिटिशांच्या भीतीने तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यवतमाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा दावा केला आहे.
![ब्रिटिशांच्या भीतीने तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा RSS Sarsanghchalak Hedgewar had refused to meet Subhash Chandra Bose says Energy Minister Nitin Raut ब्रिटिशांच्या भीतीने तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/15/fb82ff8b1fb0077c55cf0bd4b51d909a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
यवतमाळ : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रविवारी (23 जानेवारी) 125 वी जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान नेताजींबद्दल बोलत असताना राज्याचे ऊर्जामंत्री यांनी यवतमाळच्या वणी येथील कार्यक्रमात आरएसएसचे तत्कालीन सरसंघचालकांवर एक मोठी टीका केली आहे. राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार नाशिकमध्ये मुक्कामी असताना त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती. ब्रिटिशांच्या भीतीने ही भेट नाकारल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
नितीन राऊत हे वणी येथे काँग्रेस कार्यकर्ता पक्ष प्रवेश कार्यक्रम तसंच माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वांतत्र्यपूर्व काळातील एक किस्सा सांगतिला. तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार हे नाशिक येथे मुक्कामी होते. यावेळी सुभाषचंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवले होते. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने ही भेट नाकारली होती. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. तसंच आरएसएसनेच जाती जातीत भांडण तंटे उभे केले असा आरोप करच, तेच लोकांना शिकवायला निघाले, या बद्दल चिंताही राऊत यांनी व्यक्त केली. ऊर्जामंत्री राऊत यांच्या या वक्तव्यांवरुन आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सुभाषचंद्र बोस यांनी 125 वी जयंती साजरी
नुकतीच म्हणजे दोन दिवसांपूर्वी नेताजी यांची (23 जानेवारी रोजी) 125 वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. नेताजींनी 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल; नवाब मलिकांची बोचरी टीका
- MLA Son accident : टर्नला अतिवेग, सुरक्षा भिंत तोडून कार नदीपात्रात, आमदारपुत्राचा अपघात नेमका कसा झाला?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर, अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)