एक्स्प्लोर

अजित पवार युती सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागतच - रामदास आठवले

Ramdas athawale : अजित पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय असून त्यामुळे आम्ही केव्हा येऊ हे सांगता येणार नाही असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.

Ramdas athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.  या दौऱ्याप्रसंगी रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्ष नेते अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉपी करत राहुल गांधी पावसात भिजले तरी काँग्रेसला भिजवण्याची ताकद त्यांच्यात नाही, अशी घणाघातील टीका आठवले यांनी केली. अजित पवारांना पहाटेची शपथ घेण्याची सवय आहे. कदाचित अजित पवार युती सरकार मध्ये येत असतील. अजित पवार आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे रामदास आठवले म्हणाले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्याचं एकनाथ शिंदे यांच्यात सामर्थ्य आहे. टपरीवाले असे हिनवल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटलांनी शिवसेनेला चुना लावल्याचेही आठवले म्हणाले. 

पावसात भिजवून राहुल गांधी यांनी शरद पवारांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जरी पावसाने भिजले असतील तरी काँग्रेसला भिजवण्या एवढी ताकद त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे त्यांना फारसा फायदा होणार नाही. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत जोडण्यापेक्षा भारत तोडण्यासाठी यात्रा आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देण्याची ताकद ही राहुल गांधी मध्ये नसल्याचे रामदास आठवले म्हणाले. 

तर अजित पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय असून त्यामुळे आम्ही केव्हा येऊ हे सांगता येणार नाही असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. कदाचित अजित पवार इकडे येत असतील ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे, पहाटेची शपथविधी घेऊन जी अजित पवारांना जमले नाही ते डेरिंग एकनाथ शिंदेंनी केले असल्याचे म्हणत रामदास आठवलेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

तर दसरा मिळाव्यात जरी उद्धव ठाकरे यांनी टीका टिपणी केली तरी त्यास उत्तर देण्याचे सामर्थ्य हे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे गुलाबराव पाटलांना पान टपरीवाले असे हिणवलं जातं पण हा पान टपरीवाला कधी कुणाला चुना लावेल हे सांगता येत नाही, ज्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेला चुना लावला हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवसेनेने गद्दार म्हणत व्यक्तिगत टीका करू नये असा सल्लाही यावेळी रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget