एक्स्प्लोर

आप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Sambhaji Brigade: होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे

Sambhaji Brigade On Appasaheb Dharmadhikari: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर झाला आहे. मात्र आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल. तसेच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना शिवानंद भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये सुरू केला त्याचं कारण असं होतं की, महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील महाराष्ट्राला आणि इथल्या रयतेला, जनतेला भूषण वाटावं असं काही वेगळं काम करणारा जो कोणी व्यक्ति असेल त्यांचा या यानिमिताने सत्कार केला जावा. आप्पा धर्माधिकारी किंवा त्यांचे वडील पूर्वी नाना धर्माधिकारी यांना समाजसेवा म्हणून पुरस्कार दिला जातो. तर यांच्या हातून अशी कुठलीही समाजाची सेवा घडल्याचं आम्हाला माहिती नाही. कारण की हे पूर्णतः आरएसएसचे काम करतात. रामदासी बैठका घेतात. तसेच सर्वसामान्य माणसांची, महिलांची, तरुणांची दिशाभूल करतात, असा आरोप त्यांनी केला. 

या राज्याला या देशाला जो जिजाऊ, शिवरायांचा एक वारसा लाभलेला आहे. समतावादी, समानतावादी, मानवतावादी त्या सर्व बाजूंनी जर विचार केला तर त्यांना त्याचा पूर्णपणे विरोध आहे. आणि अशा लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हे अत्यंत चुकीच आहे. ही आमची मूळ भूमिका असल्याचेही संभाजी ब्रिगेडने म्हटले.

यांना पुरस्कार देता आला असता...

तर धर्माधिकारी यांच्यापेक्षाही अतिशय चांगलं काम करणारे कोकणामध्येच लोकांचे जीव वाचवणारे हिम्मतराव बाविस्कर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी अहोरात्र काम करणारे अड. पुरुषोत्तम खेडेकर, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, याचबरोबर आदिवासीसाठी मेळघाट मध्ये डॉ. कोल्हे दांपत्य काम करतात. समाजाच्या सर्वसामान्य घरापर्यंत आणि सर्व धर्मीयांमध्ये पोहोचलेले विदर्भामध्ये सत्यपाल महाराज आहेत. असे अनेक मान्यवर आहेत. या लोकांना का दिला नाही. केवळ आणि केवळ एका "समाजाचे, आरएसएसचे काम करणाऱ्या लोकांनाच हा पुरस्कार द्यायची ही महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अन्यथा जनआंदोलन उभे करण्यात येईल... 

त्यामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर संभाजी ब्रिगेड बहिष्कार टाकत असून, महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत आहे. त्वरित महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल,असा इशारा देखील यावेळी संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Embed widget