ट्विटर वॉर : रोहित पवार विरुद्ध निलेश राणे!
आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात ट्विटरवर चांगलेच शाब्दिक 'वॉर' रंगले आहे. शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर हा वाद सुरु झालाय. काय आहे हा वाद? जाणून घ्या...
साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र निलेश राणे यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. 'पवार साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असतात. पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी', अशा शब्दांत रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उत्तर दिलं.साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??
साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र https://t.co/jQ02FOLjvb — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 15, 2020
मात्र हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. रोहित यांच्या या ट्विटनंतर निलेश राणे चांगलेच भडकले. रोहित यांच्या ट्विटला उत्तर देताना निलेश राणे यांनी 'मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी', असा पलटवार केला. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये निलेश यांनी रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे? असा सवाल करत मुंबईत राहून ठाकरे काही करु शकले नाहीत, असं देखील राणे यांनी म्हटलंय.मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
यानंतर आता रोहित पवार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020