एक्स्प्लोर

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, तर संसार नीट कसा होणार? रोहित पवारांचा सेना-भाजपला टोला

राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करुन कामाला देखील लागलो आहोत. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरु असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं.

मुंबई : राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार यांची उत्सुकता सर्वांनाचा लागली आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ओला दुष्काळ सदृष परिस्थिती आहे, त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचं आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडल आहे. सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं होत असतील तर संसार नीट कसा होणार, असा टोलाही रोहित पवारांनी शिवसेना-भाजपला लगावला.

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करुन सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. सत्ता स्थापनेला होत असलेला उशीर पाहून एक नागरिक म्हणून चिंताग्रस्त आहे. राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करुन कामाला देखील लागलो आहोत. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरु असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

VIDEO | सरकार बनवण्याचा पेच लवकर सुटेल : मुख्यमंत्री

या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद पाहता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का? यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत, अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार? असा टोला  रोहित पवारांनी लगावला.

महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत, ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला. आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल, असा शब्द शिवसेनेला देऊन देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे, हे बघता प्रश्न पडतो की आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

VIDEO | शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी : संजय राऊत 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget