फडणवीस म्हणाले महापौर महायुतीचाच होणार, रोहित पवार म्हणाले मतदार यादी, EVM मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात
मुंबई महापालिकेवर महापौर महायुतीचाच होणार, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar on Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेवर यंदा महायुतीचाच भगवा फडकणार, मुंबई महापालिकेवर महापौर महायुतीचाच होणार, असे म्हणत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाला आव्हान दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ मदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवाभाऊंनी BMC निवडणुकीतील विजयाचा दाखवलेला नेक्स्ट लेव्हलचा कॉन्फिडन्स मतदार यादी, EVM मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय येणार नाही, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
पत्रकारांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, शूट करुन घ्यावं आणि त्याच्या क्लिपही साठवून ठेवाव्यात, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार’’, हा मुख्यमंत्री देवाभाऊंनी BMC निवडणुकीतील विजयाचा दाखवलेला नेक्स्ट लेव्हलचा कॉन्फिडन्स मतदार यादी, EVM मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय येणार नाही. या कॉन्फिडन्सवरही कळस म्हणजे ‘‘कुणी सोबत आलं तरी आणि कुणी सोबत नाही आलं तरी’’, अशा शब्दांत आपल्याच मित्र पक्षांनाही इशारा देऊन एकप्रकारे त्यांनाही भाजपमागे फरपटत यावंच लागेल, असा दम भरल्याचे रोहित पवार म्हणाले.
हाच आहे खरा भाजपाचा अक्राळविक्राळ चेहरा. आता भाजपाच्या दोन्ही खांद्यावर मान टाकलेले भाई आणि दादा स्वाभिमानी बाणा दाखवतात की मान कापली जाईल या भितीने भाजपच्या मागं फरपटत जातात, हे बघावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
राज्यात महायुती (Mahayuti) एकसंघ निवडणुका लवढणार आहे, तर महाविकास आघाडीचं अद्याप ठरलेलं नाही. मात्र, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्याच ताब्यात असावी, यासाठी ठाकरे बंधूंची युतीही जोरदार चर्चेत आहे. मात्र, मुंबई महापालिकेवर यंदा महायुतीचाच भगवा फडकणार, मुंबई महापालिकेवर महापौर महायुतीचाच होणार, असे म्हणत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाला आव्हान दिलं आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा विजयी संकल्प मेळावा आज मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी ब्राह्मोस मिसाईल सारखा विरोधकांवर हल्ला चढविला, आता आपल्याला कोणी आता थांबवू शकत नाही. मागच्या महापालिका निवडणुकांवेळी आपण थोडक्याने वाचलो होतो, केवळ दोनच नगरसेवक कमी पडले होते. आपल्याला माहिती आहे की कमी पडल्यावर काय करायचे ते, असे म्हणत फडणवीसांनी महापौरपदसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं सूचवलं. गत निवडणुकांवेळी उद्धवजी यांची इच्छा होती की महापौर आमचा असावा, असे शिवसेना म्हणाली. तेव्हा आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. आपण सगळ्यांना बोलवले, तेव्हा सगळे बोलले एक पाऊल मागे घेऊन त्यांना महापौरपद देऊ. त्यानुसार, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष सगळे तुम्ही घ्या, आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही. पण, जर तुम्ही कुठे चुकला तर आम्ही अंकुश ठेऊ, असे आपण सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
























