एक्स्प्लोर

सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता महिनाभर पर्यटकांसाठी बंद

सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे महिनाभरासाठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

पुणे : सिंहगड किल्ला एक महिना पर्यटकांसाठी बंद असणार आहे. सिंहगड घाटात दरड पडत असलेल्या भागात संरक्षण जाळ्या बसवण्याचं काम सुरु आहे, त्यामुळे आज 2 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. गडावर जाण्यास इच्छुकांनी पायवाटेचा वापर करावा, असं वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे महिनाभरासाठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात दरवर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळतात. त्यामुळे घाट रस्ता बंद होतो आणि अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास करण्यात आला होता. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. या कामासाठी सिंहगडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरु असताना मोठे दगड खाली पडू शकतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मानखुर्दमधील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्या पाडल्या, मुंबई पालिकेची कारवाई
मानखुर्दमधील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्या पाडल्या, मुंबई पालिकेची कारवाई
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
शिवसेनेत मोठे फेरबदल होणार, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
शिवसेनेत मोठे फेरबदल होणार, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Donald Trump : इराणसोबत शस्त्रसंधी केली पण ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
Embed widget