एक्स्प्लोर

भावाचा मृतदेह घरात ठेऊन परीक्षा दिलेल्या रियाचं जबरदस्त यश, निकाल येताच कुटुंबिय भावूक

हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील रिया अनिल खंदारे ही विद्यार्थीनी हिंगोलीच्या आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये होती. तर तिचा एकुलता एक लहान भाऊ गौरव खंदारे आठव्या वर्गात शिक्षण घेत होता.

हिंगोली : आज सकाळपासूनच सरकळी येथील अनिल खंदारे यांच्या घरात धिरगंभीर वातावरण होते, मुलगी रिया हिचा दहावीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते, दुपारी एक वाजता निकाल जाहिर होताच संपूर्ण कुटुंबच ढसाढसा रडले. लहान भावाचा मृतदेह घरात ठेऊन परिक्षा दिलेल्या रियाने विज्ञान विषयात 79 गुण मिळविलेच तर एकूण 81.20 टक्के गुण मिळविले आहेत.

हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील रिया अनिल खंदारे ही विद्यार्थीनी हिंगोलीच्या आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये होती. तर तिचा एकुलता एक लहान भाऊ गौरव खंदारे आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. अनिल खंदारे यांनी गॅस एजन्सीवर काम करून प्रतिकुल परिस्थिती असतांना दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. रिया आणि गौरव यांच्यात अभ्यासातही स्पर्धा होत होती.

दरम्यान, 10 मार्च पासूनच गौरवला ताप येऊ लागला. त्याला उपचारासाठी हिंगोली येथून नांदेडला हलविले. मात्र तेथे उपचार सुरु असतांनाच गौरवचा 16 मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. तर याच दिवशी रियाचा विज्ञान विषयाचा पेपर होता. घरात लहान भाऊ गौरव याचा मृतदेह असतांनाही मोठं दुःख बाजुला ठेऊन वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी रियाने विज्ञान विषयाचा पेपरही दिला. त्यानंतर दुपारी भावाच्या अंत्यसंस्कारासाठी ती उपस्थित राहिली.

आज दहावीचा निकाल असल्याने खंदारे कुटुंबियांकडे गंभीर वातावरण होते. दुपारी एक वाजता निकाल हाती आला आणि संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एकीकडे लहान भाऊ गेल्याचं दुःख असतानाही तिने 81.20 टक्के गुण मिळविले. यामध्ये नेमका आनंद व्यक्त करावा का आई, वडिलांना सावरायचे हेच रियाला कळेनासे झाले. या प्रसंगातही तिने भावाच्या छायाचित्रासमोर निकालाचा कागद ठेवताच सर्व कुटुंबच ओक्साबोक्सी रडले. त्यांना धिर देण्यासाठी शेजारीही आले. मात्र घरातील प्रसंग पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यातही आश्रू आले. आता पुढे वैद्यकिय अभ्यासक्रम पूर्ण करणयाची इच्छा असल्याचे रिया खंदारे हिने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल

दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, गुंगीच्या 'त्या' औषधावरून सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, गुंगीच्या 'त्या' औषधावरून सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashok Kharat Case: 'मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल', अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटलेली आलिशान कार, 90 लाख किंमत अन् 9 नंबरचं 'ते' खास कनेक्शन
'मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल', अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटलेली आलिशान कार, 90 लाख किंमत अन् 9 नंबरचं 'ते' खास कनेक्शन
Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : राज्यभरात महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन  
राज्यभरात महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन  
Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; नेमकं काय घडलं?
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Embed widget