वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, चंद्रभागेची पाणीपातळी वाढली, आषाढी एकादशीला पूर नियंत्रणासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ही 70 टक्क्यांपर्यंत आणून ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून सुरू आहे.

Solapur: पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून 41 हजार 600 तर वीर धरणातून 15 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सध्या भीमा नदीकडे येत आहे . नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेचे वाळवंट आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत .. अजूनही पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने सध्या चंद्रभागेत स्नानाला येणाऱ्या भाविकांनी काठावर उभारून केवळ पाय धुण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पूर नियंत्रणासाठी प्रशासनाचे प्रयत्न
आषाढी यात्रा काळात पंढरपूरमध्ये पूर येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासन कार्यवाही करीत आहे. त्यामुळेच सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ही 70 टक्क्यांपर्यंत आणून ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून सुरू आहे. तरीही पुणे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने उजनी धरणातून सध्या 40 हजार क्युसेक वी विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. याच पद्धतीने वीर धरणातही पाणीसाठा वाढल्याने येथून 15000 क्युसेक एवढे पाणी सोडण्यात येत आहे. सध्या पंढरपूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू असल्याने फ्री कॅचमेटमधून येणारा पाण्याचा ओघही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या चंद्रभागेत अजूनही पाण्याची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
चंद्रभागेत स्नान न करण्याचे आवाहन
भीमा नदी पात्रात उजनी धरणाच्या विसर्गामुळे येणारा पाण्याचा ओघ तसेच वीरधरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात चाळीस हजार क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग प्रवाहित झालाय . चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिर पाण्याखाली गेली आहेत .दरम्यान सर्व संतांच्या पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत . अनेक भाविक पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून देवाचे दर्शन घेण्यासाठी पुढे जातात .आषाढी एकादशीला आता केवळ पंधरा दिवस राहिले आहेत . दरम्यान भाविकांच्या गर्दीमुळे स्नान करताना पाण्याचा अंदाज येणार नाही .म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी चंद्रभागेत स्नान न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यासाठी 40 कोळी बांधवांना आपत्कालीन यंत्रणेत सामावून घेत भाविक बुडू नयेत याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे ..
हेही वाचा























