एक्स्प्लोर
लाचखोर महसूल अधिकारी शोभा राऊतला 8 वर्षांचा कारावास
उस्मानाबाद : 2014 च्या लाचखोरी प्रकरणात तत्कालीन महसूल अधिकारी शोभा राऊतला दोषी ठरवण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने शोभा राऊतला दोन वेगळ्या प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूरसाठी झाडे आणि शेतजमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शोभा राऊतने शेतकऱ्यांकडून लाच मागितली होती. 2014 मध्ये तिला 39 हजार 400 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ हात अटक केली होती.
लाच देण्यासाठी शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढले होते, हा मुद्दाही कोर्टाच्या सुनावणीदरम्यान आला होता.
उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने महसूल अधिकारी शोभा राऊतला दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी चार वर्षे, अशी एकूण आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण एकाच वेळी दोन्ही शिक्षा भोगायच्या असल्याने राऊतला चार वर्षाचा सश्रम कारावास आणि दोन्ही कलमांखाली मिळून 50 हजार दंड ठोठावण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement