एक्स्प्लोर
छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा ठराव मंजूर
छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्यासाठी महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ उपमहापौर श्रीपद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.
छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्यासाठी महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांनी महासभेत हात उंचावून पाठिंबा दिला. भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिलं. यावेळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.
या महासभेला शिवसेनेचे नगरसेवक काळे कपडे तर नगरसेविका काळ्या साड्या परिधान करुन सभागृहात दाखल झाल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी जयघोष करत शिवाजी महाराजांचा पुतळा सभागृहात आणला.
महासभेचं कामकाज सुरु झाल्यावर सदस्यांनी रा. स्व. संघावर टीका केल्यामुळे महासभेत आरोप प्रत्यारोप झाले. संघाने कधीही शिवजयंती साजरी केली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. या आरोपानंतर भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरोप प्रत्यारोप सुरु झाल्यामुळे काही काळ गोंधळ झाला.
जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. तर कॉंग्रेसनं उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उपमहापौरपदाचा उमेदवार न देण्याची मागणी केली. यानंतर एकमतानं ठराव मंजूर करुन महासभेचं कामकाज संपलं.
संबंधित बातम्या :
उपमहापौर छिंदमचा राजीनामा मंजूर, नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी
छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्ताप
नगर पोलिसांचा चकवा, छिंदमला येरवाड्याला सांगून नाशिक जेलमध्ये नेले!
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement