(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day : यवतमाळच्या तरूणाने साकारला राजपथावरील चित्ररथ
Republic Day 2022 : प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथ साकारण्याचा मान यवतमाळ येथीस भूषणसह त्याच्या सहकाऱ्याला मिळाला
यवतमाळ : प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथातील जैवविविधता विषयावर आधारित वेगवेगळे 18 शिल्प यवतमाळ येथे साकारण्यात आले आहे. यवतमाळ येथील कलावंत भूषण मानेकर यांच्या कला दालनामध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथ साकारण्याचा मान भूषणसह त्याच्या सहकाऱ्याला मिळाला. नागपूर येथील एका कंपनीने हा चित्ररथ तयार करण्याचा कंत्राट घेतला असून यामधील शिल्प भूषणच्या वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आले. जैवविविधतेचे शिल्प असून ते साकारताना कलावंत भूषण मानकर यांनी ताडोबा, टिपेश्वर आणि पेंच अभयारण्य येथे जाऊन निसर्गातील पशू-पक्ष्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी फायबरच्या 18 शिल्पांची निर्मिती केली आहे.
विशेष म्हणजे मध्ये राष्ट्रीय प्राणि वाघ तसेच शेकरू आणि सारस , बगळा, घुबड आदी पक्षी यांचे शिल्प तयार केले आहे. सध्या दिल्ली येथे संपूर्ण संच पोहचला असून त्या ठिकाणी या सर्व भागांना एकत्रित करण्यात येत आहे. प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथ मधील शिल्प तयार करतांना जीव ओतून काम केले आणि कमी दिवसांत ते काम पूर्ण केले त्याचा आनंद आहे. शिवाय ते राजपथावर ते राज्याचे प्रतिनिधित्व करणार याचा अभिमान वाटतो असे कलावंत भूषण माणेकर यांनी सांगितले आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा चित्ररथ असणार आहे. राज्य सरकारने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. 'शेकरू' हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. 'हरियाल' हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 'ब्ल्यू मॉरमॉन' या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Republic Day 2022: भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे आहे? जाणून घ्या, प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या खास गोष्टी
Republic Day 2022: यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्याविना, कोरोनामुळे केंद्राचा निर्णय
Republic Day 2022 Stickers : प्रजासत्ताक दिनादिवशी शुभेच्छा देण्यासाठी असे डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टीकर्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha