Republic Day 2023 LIVE Updates : प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
LIVE
Background
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
26 जानेवारी देशाचा राष्ट्रीय सण
वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे, परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत. ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन साजरा
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.
डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती
संविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. त्यांनी 1952 मध्ये पहिली आणि 1957 मध्ये दुसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. राजेंद्र प्रसाद मे 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती राहिले. त्यांचा कार्यकाळ सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वात मोठा आहे.
परेड संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना हात दाखवत हस्तांदोलन केलं
Republic Day 2023 : राजपथावरील परेड संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उपस्थितांना हात दाखवत हस्तांदोलन केलं.
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त अंडरवॉटर फडकवला झेंडा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तारकर्लीचा उपक्रम
Republic Day 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तारकर्लीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी अंडरवॉटर झेंडा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्कुबा च्या माध्यमातून स्विमिंग फुलामध्ये 15 ते 20 फूट खोल पाण्यात झेंडा फडकवला. यावेळी सर्वजण ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून पाण्याखाली गेले होते.
Republic Day 2023 : महाराष्ट्राचा चित्ररथ, साडेतीन शक्तिपीठ आणि नारी शक्तिवर आधारीत देखावा
Republic Day 2023 : राजपथावर मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन पार पडलं. यावर्षी साडेतीन शक्तिपीठ आणि नारी शक्तिवर आधारीत असा देखावा चित्ररथात करण्यात आला होता.
Republic Day 2023 : लग्नमंडपात जाण्याआधी भावंडांनी केलं ध्वजारोहण, गोंदियाच्या राम आणि श्याम यांची तिरंग्याला सलामी
Republic Day 2023 : लग्नमंडपात जाण्याच्या आधी वधु-वरांना मतदान करुन जातना आपन नेहमीच पाहतो. मात्र, गोंदियाच्या चांडक कुटुंबातील राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मंडपी जाण्यापूर्वी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण केलं. देशाच्या संविधानाला बळकट करण्याचं काम करत सामाजिक संदेश दिला आहे. 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना अमलात आली, त्यामुळे या दिनाची सार्वांना आठवण रहावी यासाठी राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मडंपी जाण्यापूर्वी 73 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले. चांडक कुटुंबातील वऱ्हाड्यांनी यावेळी राष्ट्रगीत म्हणत तिरंग्याला मानवंदना दिली.