एक्स्प्लोर
प्रज्ञा पवार आणि रावसाहेब कसबेंवर गुन्हा दाखल करा : शिवसेना
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरुन शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत रावसाहेब कसबे आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. आज सकाळी त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांची भेटही घेतली.
8 आणि 9 तारखेला पाटणमध्ये मराठी साहित्य परिषदेचं विभागीय साहित्य संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा पवार होत्या. तर रावसाहेब कसबे हे प्रमुख वक्ते होते. पण दोघांनीही शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य केल्याचा दावा शंभूराजे देसाई यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement