कर्जमाफी, वीज ते शेतीमालाचे दर, शेती प्रश्नांवरुन रयत क्रांती संघटना आक्रमक, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
विविध शेती प्रश्नावरुन आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची रयत क्रांती संघटना (Rayat Kranti Sanghatana) आक्रमक झाली आहे.

Rayat Kranti Sanghatana : विविध शेती प्रश्नावरुन आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची रयत क्रांती संघटना (Rayat Kranti Sanghatana) आक्रमक झाली आहे. कर्माफीसह वीज प्रश्नाच्या मुद्यावरुन आज रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर (Solapur) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.
'या' प्रश्नावरुन रयत क्रांती संघटना आक्रमक
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, दिवसा 12 तास वीज पुरवठा करा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिलं 15 टक्के व्याजासहित जमा करा, सोयाबीनला 6 हजार रुपयांचा दर द्या तसेच कांद्याला 4 हजार रुपयांचा हमी भाव द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.
दोन तीन वर्षापासून आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन घटलं
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत. परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. मागील दोन तीन वर्षापासून आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलं आहे. परिणामी शेती आतबट्टयाचा धंदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जाचे पैसे भरावेत असे वक्तव्य केलं होतं. त्यामुळं देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कर्जमाफी होणार की नाही? शेतकऱ्यांचा सवाल
सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध आश्वासने दिली होती. यातील एक आश्वासन म्हणजे कर्जमाफीचे होते. मात्र, कर्जमापीबाबत कोणीही काहीही बोलताना दिसत नाही. त्यामुळं कर्जमाफी होणार की नाही? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना 2100 रुपये देण्याचे आस्वासन देखील सरकारनं दिले होते. मात्र, अद्यात ते आश्वासन पूर्म केले नाही. महिलांना 1500 रुपयेच दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी विविध आश्वासाने दिली होती. यामध्ये महायुतीनं त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं महत्वाचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होतं. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळं या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपुरता हा फक्त चुनावी जुमला होता अशी टीका विरोधक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:

























