एक्स्प्लोर
...तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अडथळा आणणारे अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कानाखाली लगावेन, अशी धमकी अपक्ष आमदार रवी राणा यांनी जाहीर सभेतच दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण प्रवीण पोटे यांनीच थांबवलं होतं, असा आरोप करत रवी राणा यांनी ही धमकी दिली.
अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नियोजित होतं. मात्र परवानगी मिळण्याआधीच 13 तारखेच्या मध्यरात्री आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रवी राणा यांनी ही धमकी दिली.
रवी राणा हे अमरावतीतील अपक्ष आमदार आहेत. तर प्रवीण पोटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रीही आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement