एक्स्प्लोर
रत्नागिरीत व्यापाऱ्याची मित्रांकडूनच गोळ्या झाडून हत्या
आनंद क्षेत्री पाच मित्रांसह चारचाकीतून जात असताना गाडीतीलच एकाने रिव्हॉल्वरने त्याच्यावर गोळीबार केला.

रत्नागिरी : रत्नागिरीमधील उद्यमनगर इथे व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गाडीमध्ये मित्रांकडूनच व्यापाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. आनंद क्षेत्री असं मृत व्यापाऱ्याचं नावं आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आनंद क्षेत्री पाच मित्रांसह चारचाकीतून जात असताना गाडीतीलच एकाने रिव्हॉल्वरने त्याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती संरक्षक भिंतीवर धडकली. आनंद क्षेत्री रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























