मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी
मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
Ratnagiri Accident : मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी महिंद्राची मेराझो कार अचानक थेट ट्रकच्या खाली घुसली आणि त्यामुळं हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध कारणांनी या महामार्गावर अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशा अपघातात अनेकांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना वारंवर घडत आहेत. दरम्यान, आज अपघातात एकाचा मृत्यूझाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
माथेरान घाटात अपघाताची मालिका सूरूच
रायगड जिल्ह्यातील माथेरान घाटातील अपघातांची मालिका सुरूच आहे. आज माथेरान घाटात एका कार कंपनीची पुन्हा एक नवीन ट्रायल करण्यासाठी आलेली कार थेट एका नाल्यात शिरल्यामुळं या वाहनाचे नुकसान झाले आहे. माथेरान घाटात असणाऱ्या जुमापट्टी स्थानकाच्या वरील वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























