Accident News: देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; पिकअप अन् ट्रकचा भीषण अपघात, 10 भाविकांचा मृत्यू; 7 लहानग्यांचा समावेश
Accident News: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. खाटू श्याम मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात झाला ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला.

राजस्थान: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident News) एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 7 मुले आणि 3 महिलांचा समावेश आहे. या अपघातात (Accident News) अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.(Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृतक खाटू श्याम येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर परतत असताना दौसा येथे भाविकांच्या पिकअपचा आणि ट्रकचा अपघात (Accident News) झाला. या अपघातात पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या 7 मुलांसह 3 महिलांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी होते.(Accident News)
पिकअपची ट्रकशी भीषण धडक झाली. स्थानिक लोकांनी या अपघाताबाबत माहिती देताना सांगितलं की, बुधवारी सकाळी भाविकांना घेऊन जाणारा एक पिकअप ट्रक खाटू श्याम येथून येत होता. या दरम्यान दौसा येथे एका मोठ्या ट्रकला धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की 7 मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना एसपी सागर राणा म्हणाले की, खाटू श्याम मंदिरातून येणाऱ्या भाविकांच्या अपघाताची माहिती मिळाली होती. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात जखमी झालेल्या सुमारे 7-8 जणांना जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील एटा येथून खाटू श्याम दर्शनासाठी गेलेले
या अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व 10 भाविक उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी होते. स्थानिकांनी सांगितले की, भाविकांनी भरलेला पिकअप ट्रक एका कंटेनरला धडकला, ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांनी व्यक्त केला शोक
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला शोक
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुःखद घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना चांगले उपचार मिळावेत आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करावी, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."
Rajasthan: 11 dead as pick-up vehicle carrying devotees collide with trailer truck in Dausa
— ANI Digital (@ani_digital) August 13, 2025
Read @ANI Story | https://t.co/MGRIt1Hb9D#Rajasthan #Accident #Dausa pic.twitter.com/mQBuKLtIL4
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी






















