एक्स्प्लोर
रत्नागिरीत कार नदीत कोसळली, चार जण बेपत्ता!
रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने, कार थेट माहामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसवी नदीत कोसळली.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कार नदीत वाहून गेल्याने चार जण बेपत्ता झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या धामणी गावाजवळच्या यादववाडी परिसरात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने, कार थेट माहामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसवी नदीत कोसळली. अपघातावेळी कार चालक नदीत फेकला गेल्याने, ग्रामस्थांनी त्याला वाचवलं. मात्र कारमधील इतर चार जण बेपत्ता आहे.
कारने नदीचा तळ गाठल्याने ती दिसतही नाही. स्थानिक पोलिस, तटरक्षक दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने नदीपात्रात बचावकार्य सुरु आहे.
रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने, कार थेट माहामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसवी नदीत कोसळली. अपघातावेळी कार चालक नदीत फेकला गेल्याने, ग्रामस्थांनी त्याला वाचवलं. मात्र कारमधील इतर चार जण बेपत्ता आहे.
कारने नदीचा तळ गाठल्याने ती दिसतही नाही. स्थानिक पोलिस, तटरक्षक दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने नदीपात्रात बचावकार्य सुरु आहे. Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion