एक्स्प्लोर
रतन टाटा संघ मुख्यालयात, भेटीनं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या!

नागपूर: टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा प्रकल्पासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आदिवासी आणि राष्ट्र निर्माणाच्या कामात काम करण्याचा मानस रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे. वनवासी कल्याण आश्रम या नावानं संघाचं गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात काम आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांची गच्छंती केल्यापासून टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानंतर आज अचानक रतन टाटा सरसंघाचालकांच्या भेट घेतल्यानं उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























