एक्स्प्लोर
माझा इफेक्ट : रावसाहेब दानवेंनी आपलं थकित वीजबिल भरलं
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपलं अडीच लाखांचं थकित वीजबिल अखेर भरलं आहे. माझाच्या वृत्तानंतर त्यांनी हे बिल भरलं आहे.
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपलं अडीच लाखांचं थकित वीजबिल भरलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानंतर त्यांनी वीजबिल भरलं आहे. जालन्याच्या भोकरदनमधील दानवेंच्या राहत्या घराचं 2 लाख 59 हजार 176 रुपयांचं वीजबिल थकित होतं.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची महावितरणचं तब्बल अडीच लाखांचं वीजबिल थकवलं होतं. दानवेंचं भोकरदनमधील घराचं गेल्या 83 महिन्यांपासूनचं वीजबिल थकलेलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे महावितरणनेही दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नव्हती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचं तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचं वीजबिल दानवेंनी थकवलं. महावितरणनं जारी केलेल्या जुलैच्या वीजबिलावर तसा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला होता. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement