एक्स्प्लोर
Advertisement
राणे हे चांगल्या खात्याचे मंत्री असतील : आठवले
‘नारायण राणेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करुन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. राणे लवकरच एनडीएत सामील होतील. तसेच ते एनडीएमध्ये आल्यानं आमची ताकद आणखी वाढेल.’ असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
शिर्डी : ‘नारायण राणे हे लवकरच एनडीएत सामील होतील आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांचा योग्य सन्मानही होईल.’ असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. शिर्डी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘नारायण राणेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करुन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. राणे लवकरच एनडीएत सामील होतील. तसेच ते एनडीएमध्ये आल्यानं आमची ताकद आणखी वाढेल.’ असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात राणे हे चांगल्या खात्याचे मंत्री असतील.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत घेतलं तर शिवसेना बाहेर पडणार, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे एनडीएत दाखल होतील आणि त्यांना राज्यात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.
त्याच पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी केलेलं हे वक्तव्य फारच महत्त्वाचं आहे. .त्यामुळे आता राणेंना नेमकं कोणतं खातं मिळणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
शिवसेनेविरोधातलं अस्त्र म्हणून राणे एनडीएत?
शिवसेनेविरोधात वापर करण्यासाठी राणेंना एनडीएत घेतलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र कुणाला उत्तर देण्यासाठी कुणाचा बळी आम्ही घेणार नाही. भाजपकडे सक्षम नेते आहेत, असं दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या :
राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत : रावसाहेब दानवे
नारायण राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार- सूत्र
सैन्यात भरती व्हा, देशी दारुऐवजी इंग्लिश दारु प्यायला मिळेल : आठवले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement