एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या सांस्कृतिक मेळाव्यात राणेंचा बोलण्यास नकार
सिंधुदुर्ग : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरुन सर्वत्र जोरदार चर्चा रंगली असताना, आज सिंधुदुर्गमध्ये जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात नारायण राणे आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आपण योग्य वेळ आली की बोलेन, असं सांगून बोलण्यास नकार दिला.
''पदाधिकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यकर्त्यांसाठी स्नेहसंम्मेलन आयोजित केलं आहे. मी कधीच या कार्यक्रमात संबोधन करत नाही. यावर्षीही करणार नाही. योग्य वेळ आली की मी बोलेनच,'' असं स्पष्टीकरण नारायण राणेंनी दिलं आहे.
राणेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी नारायण राणे हे देखील अहमदाबाद मध्येच होते.
त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळालं होतं. यानंतर काँग्रेस हायकमांडच्या आदेशावरुन काँग्रेस नेत्यांनी राणेंची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण राणेंनी त्याला दाद दिली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.
त्यामुळे राणे आज काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष होतं. पण राणेंनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश अजून गुलदस्त्यातच असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, राणेंना भाजपत प्रवेश देण्यावरुन शिवसेनंन भाजपला लक्ष्य केलं आहे. नारायण राणे हे उतरत्या वयात त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत. कोणत्या पक्षानं त्यांचं पुनर्वसन करावं हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement