(Source: Poll of Polls)
Ramtek Lok Sabha : नागपुरात भाजप आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर;भाजप जिल्हाध्यक्षांचे शिवसेनेला खडे बोल
Ramtek Lok Sabha : रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवानंतर नागपुरात महायुतीत खडाजंगी रंगताना दिसत आहे. अशातच नागपूर भाजप जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.
Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक लोकसभा मतदारसंघात ( Ramtek Loksabha Constituency) भाजपमुळेच (BJP) शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मते मिळाली. ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंच नाही, त्यांनी जरा आत्मचिंतन करावं की हे 5 लाख 33 हजार मतं कोणाच्या जोरावर मिळाली आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेचं बळ किती आणि भाजपचे बळ किती याचेही शिवसेनेने आत्मचिंतन करावं. अशा शब्दात भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभवावरुन महायुती सुरू असेलेल्या धुसफूसबद्दल शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.
एवढेच नाही तर शिवसेनेचे कृपाल तुमाने (Krupal Tumane) दोन वेळेला भाजपच्या मतांच्या भरवशावरच खासदार झाले होते, याची आठवण ही कोहळींनी करून दिलीय. नेकतेच शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी रामटेकमधील पराभवबद्दल बावनकुळे आणि भाजप वर गंभीर आरोप केले होते. यावर भाष्य करताना भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेला खडे बोल सुनावल्याचे पुढे आले आहे.
शिवसेनेने आत्मचिंतन केले पाहिजे - सुधाकर कोहळे
महायुतीतील जागा वाटपात रामटेकची जागा भाजपला द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र वरिष्ठ पातळीवर तसा निर्णय झाला नाही. त्यानंतर भाजपसाठी एनडीएची एक-एक सीट महत्त्वाची आहे, या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्त्यांनी रामटेकसाठी प्रचंड मेहनतही घेतली. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे रामटेक मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मते मिळाली. ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंच नाही, रामटेक मध्ये आपलं बळ किती आणि भाजपचे बळ किती आहे, याचे शिवसेनेने आत्मचिंतन केले पाहिजे. पराभवाचे कारण शोधले पाहिजे.
यापूर्वी दोन वेळेला कृपाल तुमाने रामटेकचे खासदार झाले. तेव्हाही शिवसेनेला मिळालेली मत भाजपचे भरवशावर होती हे विसरून चालणार नाही. असे म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या आरोप खोडून काढत प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते कृपाल तुमाने?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी भाजपवर गंभीर आरोप करत रामटेक ही जागा शिवसेनेकडे राहिली नाही मला याचं दु:ख असल्याची खदखद बोलून दाखवली होती. मी दोन वेळा रामटेचं प्रतिनिधित्व केलं, मोठ्या फरकाने निवडून आलो. मुकुल वासनिकसारख्या काँग्रेसच्या तगड्या नेत्याला मी दोनवेळा मोठ्या फरकाने हरवलं. कामठीतून महायुतीच्या उमेदवाराला कमी मतं मिळाली ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनुकळे त्यांची जबाबदारी आहे. पराभवाचे विलन बावनकुळेच आहेत. त्यांनी राजिनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी कृपाल तुमाने यांनी केली होती. विशेष म्हणजे याबाबतची तक्रार भाजपचे दिल्लीतील नेते अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कोणता सर्वे केला मला माहिती नाही. मात्र त्यांनी हट्ट धरला की ही जागा मला मिळायला नको. त्यांनी शिंदे साहेबांवर दबाव टाकला की ही जागा इतर कुणाला द्या. ज्यांचा विधानसभेमधे परफॉर्मन्स चांगला नाही त्यांच्यावर कारवाई करू असं ते म्हणाले होते. आता त्यांच्या कामठीमधून या उमेदवाराला सगळ्यात कमी मतं मिळाली. त्यामुळे आता बावनकुळे काय करावाई करतात हे पाहावं लागेल, अशी नाराजीही तुमाने यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या