एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरुन उचलबांगडी
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना चांगलाच भोवला आहे.
मुंबई : औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना चांगलाच भोवला आहे. कारण, रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 15 जानेवारीला औरंगाबादेत रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंविरोधात शेरेबाजी केली होती. हा वाद थेट ‘मातोश्री’वर धडकल्यानंतर रामदास कदमांकडून औरंगाबादचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या बदल्यांसंबंधी सामान्य प्रशासन विभागाकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार रामदास कदम यांची नांदेड पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. दीपक सावंत यांची औरंगाबाद आणि गुलाबराव पाटील यांची परभणीच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुंदोपसुंदी सुरुच आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना आधी समजही दिली होती. मात्र, 15 जानेवारीला औरंगाबादमध्ये बोलताना रामदास कदमांनी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंवर शेरेबाजी केली.
खैरे यांनी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामकरणाचा विषय लावून धरला आहे. नामांतराचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेने उपस्थित केला होता. पण याप्रकरणी शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप खैरेंनी केला होता. याचबाबत बोलताना रामदास कदम यांनी खैरेंना फटकारलं होतं.
‘खैरे खासदार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पाहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण साप-साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा.’ अशी शेरेबाजी कदमांनी केली होती.
या सर्व प्रकारानंतर 'मातोश्री'च्या आदेशावरुन रामदास कदम यांची औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरुन अखेर आज उचलबांगडी करण्यात आली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
क्राईम
राजकारण
Advertisement