एक्स्प्लोर

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले

संजय राऊत हे कधी सामना मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणूनही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो. मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचराविरुद्ध मी मूळ पँथर असल्याचे आठवले म्हणाले.

हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला, आंदोलन केले. लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडवले होते. त्यामुळे मी 2 ऑक्टोबरला हाथरसला जाऊ शकलो नाही. आता मात्र उद्याच हाथरसला जाऊन पीडित दलित कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीवर अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे.

कंगना राणावत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही. ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. अभिनेत्री पायल घोषही तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे. त्यातून आम्ही तिची बाजू घेतली. संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत. पण संजय राऊत हे कधी सामना मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणूनही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला नाही. दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे, पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का? असा सवाल रामदास आठवले यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget