एक्स्प्लोर

राहुल गांधींवरील कारवाई योग्यच, ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत - रामदास आठवले

Sharad Pawar : राहुल गांधी यांच्यावरील कारवाईशी भाजपाचा संबंध नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 

Ramdas Athawale On Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.  राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमध्ये भाजपाचा संबंध नाही.  राहुल गांधींनी याआधी अनेक वेळा चुकीचे वक्तव्य केली आहेत, एकदा त्यांना माफी देखील मागावी लागली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. तसेच मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा टोला देखील आठवलेंनी लगावला आहे.  

शरद पवारांनी आता एनडीएसोबत यावं, मंत्री रामदास आठवलेंची ऑफर -

शरद पवारांना आता एनडीएसोबत यावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे, असे निमंत्रण देत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून मोदींकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक केले आहे. तसेच शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या. तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे, असे ही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट -

मनसे नेते राज ठाकरे यांचावरही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. मुंबईचा मुख्यमंत्री शिंदे आणि उप मुख्यमंत्री फडणवीस विकास करत असताना त्याला डान्सबार म्हणणं चुकीचं आहे. तसेच राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये, भोंगे काढण्या पेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये आणि राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. 

आठवलेची शिर्डी लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवण्याची इच्छा -

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा मिळाव्यात, अशी आपली मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा देखील करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget