एक्स्प्लोर
भाजप उमेदवाराच्या पालखीला खांदा देणार नाही : राजू शेट्टी
सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराच्या पालखीला खांदा देणार नाहीत, अशी रोखठोक भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त भाजपच्या उमेदवाराचाच प्रचार करावा अशी कोणाची भूमिका असेल, तर ते आता शक्य नाही. राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराच्या पालखीला खांदा देणार नाहीत असं राजू शेट्टी म्हणाले.
सरकारमधील माणसाने आक्रमक व्हायचे नसते, तर चळवळीमधील माणसाने आक्रमक व्हायचे असते. सध्या सदाभाऊ खोत सरकारमध्ये आहेत आणि मी चळवळीमध्ये आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत सरकारमध्ये असल्याप्रमाणे वागतात आणि मी आक्रमकपणे वागतो, असे सांगत सदाभाऊंच्या आक्रमकपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement