एवढ्या आपत्ती येऊनही विमा कंपन्यांनी 50 हजार कोटी कमावले, या घोटाळ्याला सरकार जबाबदार, राजू शेट्टींचा प्रहार
एवढ्या आपत्ती येऊनही विमा कंपन्यांनी 50 हजार कोटी रुपये कमावले आहेत. हा मोठा घोटाळा असून, याला सरकार जबाबदार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti : एवढ्या आपत्ती येऊनही विमा कंपन्यांनी 50 हजार कोटी रुपये कमावले आहेत. हा मोठा घोटाळा असून, याला सरकार जबाबदार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आम्ही आंदोलन केले म्हणून विम्याचे पैसे मिळाल्याचे शेट्टी म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात विमा कंपन्यांनी 50 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. विमा योजनेची खरी परिस्थिती समोर आली आहे. मागच्या काळात खोटं रेकॉर्ट करुन पिक विमा काढला आहे. अधिकारी निलंबित केले त्यावर काही कारवाई नाही. याचा अर्थ सरकार यांना पाठीशी घालत आहे असे शेट्टी म्हणाले. वाहन अपघातात खर्च देतो तशी भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे, ही आमची मागणी असल्याचे शेट्टी म्हणाले.
अजित पवारारांना सरकारच्या तिजोरीच्या परिस्थितीची माहिती
अजित पवार हे स्वतः शिस्तप्रिय नेते आहेत. त्यांना सरकारच्या तिजोरीची परिस्थिती माहिती आहे. मग या घोषणा का केल्या असा सवाल शेट्टींनी केला. महायुती सरकारने घोषणा केली त्याप्रमाणे सातबारा उतारा कोरा करावा असे शेट्टी म्हणाले. सरकारने नाशिक जिल्हा बँकेला भावभांडवल दिले तर शेतकऱ्यांना मदत होईल बँक पूर्वपदावर येईल असे शेट्टी म्हणाले. शेतकरी थकबाकीदार असल्याने कर्ज मिळत नाही, त्यांना सावकारी आणि इतर बँकेकडून कर्ज घ्यावं लागत असल्याचे शेट्टी म्हणाले.
सरकारने आमदारांच्या सुरक्षेसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले. हे वळू इतके दिवस पोसले, ही आकडेवारी जाहीर करावी असे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाही.
मायक्रो बँक 18 टक्क्यांनी कर्ज देते. या गुंडांना आम्ही दणका देणार असल्याचे शेट्टी म्हणाले. 15 दिवसात आम्ही तुम्हाला दाखवू असा इशारा शेट्टींनी दिला आहे. जे स्थिगिती दिली त्यांनी काय केले त्यावर काही शेतकरी कर्ज भरायला तयार आहेत. सरकारने जिल्हा बँकेला उसने पैसे दिले तरी बँक जिवंत होईल. 625 कोटी मदत झाली तर नाशिकची बॅक पूर्वपदावर येईल असे शेट्टी म्हणाले.
लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यापेक्षा मुलांना दवाखान आणि शिक्षण द्यावे
लाडकी बहीण योजना ही मतदानासाठी केली होती. यातून लाच देण्याचे काम यांनी केल्याचे शेट्टी म्हणाले. लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यापेक्षा मुलांना दवाखान आणि शिक्षण द्यावे, ही माझी भूमिका असल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकरी चळवळीमध्ये जे काम करतील त्यांना सोबत घेऊ असंही ते म्हणाले. महायुती नेत्यांनी सातबारा कोरा करणार घोषणा केली. मात्र मोठे उद्योगपतीनांच कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांना मदत नाही असे शेट्टी म्हणाले.























