एक्स्प्लोर
दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटी अध्यक्षपदी राजीव सातव
राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. यावेळी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली नसली तरी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत सध्या ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत
दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने छाणणी समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि महाराष्ट्रातले युवा नेते राजीव सातव यांची निवड केली आहे. झारखंड नंतर आता सगळ्यांचे लक्ष दिल्लीच्या निवडणुकांकडे असणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कालावधी संपतोय. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिकीट वाटपासाठी छाननी समितीची जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे असणार आहे.
राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. यावेळी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली नसली तरी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत सध्या ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना आणि सध्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी असताना दोघांच्याही विश्वासू गोटात राजीव सातव यांचे स्थान कायम आहे.
दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला इथे भोपळाही फोडता आलेला नव्हता. त्यामुळे यावेळी काँग्रेसची कामगिरी कशी असणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. आम आदमी पक्षाने मागच्यावेळी 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. गेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट होत चाललेली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये हे चक्र थांबवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीतून राजीव सातव यांनी मोदी लाटेतही यश मिळवले होते. सातव यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुक न लढवता पक्षसंघटचनेचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement