एक्स्प्लोर
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपकडून पालघरच्या रणांगणात?
काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांना काँग्रेसकडून जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. आता फक्त शिंगडा यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
![काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपकडून पालघरच्या रणांगणात? Rajendra Gavit likely to contest from BJP in Palghar काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपकडून पालघरच्या रणांगणात?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08050917/Gavit-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीला मोठं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर भाजपने हालचाली वाढवल्या आहेत. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
राजेंद्र गावित हे काँग्रेसचे नेते असून, आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री होते.
पालघर पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र गावित यांना आयात करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आज संध्याकाळीच राजेंद्र गावित हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांना काँग्रेसकडून जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. आता फक्त शिंगडा यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे राजेंद्र गावित हे नाराज आहेत.
दरम्यान, पालघरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पालघरमध्ये कोण उमेदवार असावा, यावर तब्बल अडीच ते तीन तास खलबतं झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पालघरमधील उमेदवार निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
पालघरमध्ये सेना आज अर्ज भरणार, भाजप अजूनही तळ्यात-मळ्यात
श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेचं अजूनही वेट अँड वॉच!
श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीवर शिवसेनेचं शिक्कामोर्तब
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
08 May 2018 08:15 AM
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)