एक्स्प्लोर

वसई-विरारमध्ये चाळमाफियांचा हैदोस, राज ठाकरेंकडूनही दखल

महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासन हे सर्वजण आपल्या खिशातच असल्याचे सर्वसामान्यांना सांगून, तक्रारी जागच्या जागी दाबल्या जात आहेत.

ठाणे : वसई-विरार भागातील चाळमाफियांचा हैदोस काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने समोर आणला होता. या परिसरातील सुमारे सहा हजार हेक्टर शासकीय जमीन, डोंगर चाळमाफियांनी भुईसपाट केले आहे. या बातमीची दखल घेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शिवाजी पार्कातील जाहीर सभेत उल्लेख केला. चाळमाफियांनी काय हैदास घातला आहे? वसई-विरार या परिसरातील सहा हजार हेक्टर शासकीय जमीन, डोंगर भुईसपाट करुन, महापालिका, महसूल विभाग, वन विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यादेखतं हजारो चाळी या माफियांनी वसवल्या आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या चाळमाफियांनी आपल्या हस्तकांकरवी जाळल्या होत्या. नेमकं प्रकरण काय आहे? वसई पूर्वेकडील राजीवली वाघरालपाडा परिसरात सहा हजार हेक्टर जागा वनविभाग, शासकीय, आरक्षित, तसेच आदिवासी जागा होत्या. आदिवासींना धमकावून शासकीय बांबूना हाताशी धरुन, येथे चाळमाफियांनी अनधिकृत चाळींचं साम्राज्य उभं केलं आहे. या परिसरात दुसरी ‘धारावी’च वसवलेली आहे. धक्कादायक म्हणजे, चाळमाफियांनी या भागात मोठ-मोठे डोंगर पोखरले आहेत. नैसर्गिक नाले मातीचा भराव टाकून बंद करण्यात आले आहेत. डोंगर पोखरुन राजरोसपणे चाळींची बांधकामं सुरुच आहेत. जर कुण्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासन हे सर्वजण आपल्या खिशातच असल्याचे सर्वसामान्यांना सांगून, तक्रारी जागच्या जागी दाबल्या जात आहेत. चाळमाफियांची दादागिरी आणि भ्रष्ट प्रशासनाची हतबलता, यामुळे सर्वसामान्य भूमीपुत्र मात्र हतबल होत असल्याचेच चित्र वसई-विरारमध्ये पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंकडून दखल राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जे रेट कार्ड दाखवला होतं, तेच एबीपी माझाने बातमीत दाखवले होते. तीन ते चार लाखात रुम, पाचशे ते हजार रुपयात रुम भाड्याने, 24 तास पाणी, 24 तास लाईट, तर रेल्वे स्टेशनपासून ने-आणची सुविधा, अशा अनेक सुविधांचा उल्लेख या चाळमाफियांच्या पत्रकात आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील सविस्तर वृत्त 18 फेब्रवारीला प्रसारित केले होते. त्याची दखल घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला केवळ दिखाऊ कारवाई केली होती. मात्र आता राज ठाकरेंनीच मुद्दा हाती घेतल्याने तरी अधिकारी याकडे गांभिर्याने पाहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Embed widget