एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरे कुणाला घाबरतात?
“मी कुस्ती लावायला आलोय, लढायला नाही. तेव्हा सबुरीने घ्या.”
पुणे : आपल्या रोखठोक भाषणातून ‘ठाकरी शैली’चे फटकारे देत, भल्याभल्यांना घाम फोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकीय क्षेत्रात भलेभले घाबरुन असतात. मात्र, दस्तुरखुद्द राज ठाकरे कुणाला घाबरतात, हे तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिले आहे.
त्याचं झालं असं की, पुण्यातील ओतूरमध्ये आज राज ठाकरे आले होते. ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी आपण कुणाला घाबरतो, हे राज ठाकरेंनी सांगितलं.
कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानांची आपल्याला भीती वाटते, अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. अर्थात, राज ठाकरे यांचं हे विधान ऐकून आजूबाजूला असणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला. कारण राजकारणात भल्याभल्यांना आपल्या ठाकरी शैलीने घाम फोडणारे राज ठाकरे कुणाला घाबरतात, हे पहिल्यांदाच त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलतानाही राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली. “मी कुस्ती लावायला आलोय, लढायला नाही. तेव्हा सबुरीने घ्या.” अशी विनंती राज ठाकरेंनी पैलवानांना केली. तसेच, ते पुढे म्हणाले, “नाहीतर सगळे मिळून मलाच रिंगणात घ्याल आणि लंगोटीवर घरी पाठवाल. मग बायकोनं लंगोटीवर बघितलं तर म्हणेल हे घरात कोण आलंय?”
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर अर्थातच आखाड्यात एकच हशा पिकला. एकंदरीत राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील ‘माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement