एक्स्प्लोर
अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील : राज ठाकरे
मुंबई : केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
दुसरीकडे, औरंगाबादमध्ये श्रीहरी अणेंचा केक कापून शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरात राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा केक कापला. वाढदिवसानिमित्त या केकचं कटिंग करण्यात आलं होतं.
स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विधानानंतर श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर यापुढे स्वतंत्र विदर्भासाठी लढत राहीन असा निर्धार त्यांनी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र करा अशी भूमिका श्रीहरी अणेंनी घेतली.
अणेंच्या भूमिकेमुळे दिल्लीत त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. काँग्रेस नेते नितेश राणेंनी याची जबाबदारी स्वीकारली होती.
संबंधित बातम्या :
श्रीहरी अणेंकडून वाढदिवसाला स्वतंत्र विदर्भाचं केक कटिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement