एक्स्प्लोर
येत्या 24 तासात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज
येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वारे ताशी 55 ते 75 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर गेलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय होताना दिसतोय. काल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भातील बराच भाग आणि मराठवाड्यातील काही भागांवर ढग दाटलेले दिसून येत आहेत. यावरुन आपल्याला पावसाचा अंदाज बांधता येईल. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोल्हापुरात जोरदार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज शहरामध्ये काल ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अचानक आलेल्या परतीच्या पावसानं गडहिंग्लजला झोडपून काढलं. त्यामुळे अख्ख्या गावात पूरस्थिती निर्माण झाली. सुदैवाने गाव डोंगर उतारावर असल्यानं पाणी वाहून गेलं. पण तासाभराच्या पावसाने लोकांची मात्र त्रेधा उडाली. गडहिंग्लजमधल्या बाजारपेठेत तर पावसाने धुळदाण उडवली. कोल्हापूर शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस बरसला.
21 सितंबर मौसम पूर्वानुमान: तूफान से ओडिशा, आंध्र प्रदेश तेलंगाना व पश्चिम बंगाल में मध्यम से भारी बारिश #WeatherForecast #Rain #Odisha #AndhraPradesh #Telengana #WestBengal #Cyclone #HeavyRain pic.twitter.com/iE0st5yaZV
— SkymetWeather (@SkymetWeather) September 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement