एक्स्प्लोर

संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

मुंबईसह अनेकठिकाणी उद्यासाठी यलो अलर्ट आहे तर उद्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस ह्या भागात बघायला मिळू शकतो.

मुंबई : ऑगस्ट संपता संपता महाराष्ट्राला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्यानं दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. देशासह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मागील 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. त्यात काल मराठवाड्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत देखील चांगली वाढ झाली आहे. 

कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात चक्रीय स्थितीत याचे रुपांतर होत असल्याने विदर्भात आजपासून पुढील 2 दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस बघायला मिळू तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

कोकणात काय परिस्थिती असणार? 

कोकणात पुढील 5 दिवस सर्वत्र पाऊस बघायला मिळणार आहे. प्रामुख्याने उत्तर कोकणात धुवांधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह अनेकठिकाणी उद्यासाठी यलो अलर्ट आहे तर उद्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस ह्या भागात बघायला मिळू शकतो. मुंबईत देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रात काय स्थिती आहे? 

मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात 8 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उद्यासाठी मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाअंदाज आहे. ज्यात सातारा, पुणे आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधारेची शक्यता देखील आहे. 

मराठवाड्यासाठी काय आहे अंदाज? 

मराठवाड्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. काल बीडमध्ये 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर औरंगाबाद आणि लातुरात 110 मिमी पावसाची नोंद बघायला मिळाली आहे. पुढील 3 दिवस देखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मराठवाड्यात 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

विदर्भात काय असणार अंदाज? 

विदर्भात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील 3-4 दिवस विदर्भात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यात हाच जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. उद्यासाठी संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी 15 ते 64 मिमी पावसाचा अंदाज आहे. तर 7 सप्टेंबर रोजी प्रामुख्याने पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget