एक्स्प्लोर
नागपूर बार तोडफोड प्रकरणी आमदार कृष्णा खोपडेंच्या घराची झडती
नागपूर : नागपूरच्या क्लाऊड सेव्हन बारमध्ये हाणामारी प्रकरणात काल पोलिसांनी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराची झडती घेतली. खोपडे यांचा लहान मुलगा रोहित खोपडे फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी हा छापा टाकला होता. खोपडेंचा मोठा मुलगा अभिजीत जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रोहित आणि अभिजीत खोपडे या दोघांवरही क्लाऊड सेव्हन बारमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी 307चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या रविवारी रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीत खोपडे आणि क्लाऊड 7 च्या कर्मचार्यांमध्ये बिलावरून झालेल्या भांडणात बारची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
अभिजीतने आपला धाकटा भाऊ रोहित खोपडेलाही आपल्या मदतीसाठी बोलावले. रोहितसोबत शुभम महाकाळकर हा त्यांचा मित्रही आला होता. बारमध्ये तोडफोड करुन परत जाताना या प्रकरणाशी संबंध नसलेल्या शुभमवर हल्ला होऊन त्याची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून रोहित खोपडे फरार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
भारत
Advertisement