एक्स्प्लोर

Rahul Shewale : माझ्यावर खोटे आरोप, बदनामी करण्यासाठी कारस्थान; या प्रकरणाची NIA कडून चौकशी करावी :  राहुल शेवाळे 

Rahul Shewale : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केलं आहे.

Rahul Shewale : माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केलं. माझ्या पक्षातील लोकच त्या महिलेला संपर्क करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मला या प्रकरणी मदत केली असल्याचं शेवाळेंनी सांगितलं. त्या महिलेला कोरोनाच्या काळात मी मदत केली असल्याचा खुलासाही त्यांनी केला. त्यानंतर त्या महिलेनं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळेंनी सांगितले. याप्रकरणाची NIA  कडून (National Investigation Agency) चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी शेवाळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती पसरवली

सदरची महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेनं फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या आल्या असल्याचेही शेवाळे म्हणाले. ही महिला खोट्या तक्रारी करत असल्याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याबाबत लक्ष घालण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब यांना सांगितले होते. याप्रकरणी मला उद्धव ठाकरेंनी मदत केल्याचे शेवाळेंनी सांगितले. शिवसेना सोडल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकतर्त्यांनी माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. युवा सेना प्रमुखांमुळेच या गोष्टी घडल्या असल्याचे म्हणत शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. या महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी फॉलो करत असल्याचेही शेवाळे म्हणाले.

सदर महिला दाऊद गँगशी संबंधित

सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचेही शेवाळे म्हणाले. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची NIA च्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. जर मी दोषी असतो तर त्याचवेळी कारवाई झाली असती असेही शेवाळेंनी सांगितले. संबंधित महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचे शेवाळे म्हणाले. 

 ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझी बदनामी 

माझ्या तक्रारीनंतर सदर महिला दुबईच्या तुरूंगात गेली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. आरोप करणारी महिला बार डान्सर आहे. या महिलेला ठाकरे गटातील नेत्यांची फूस आहे. मी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझी बदनामी सुरु असल्याचं शेवाळेंनी सांगितले. संसदेत मी AU नाव घेतल्यानं माझ्याविरोधात कट रचला आहे. युवासेना प्रमुखांचा माझ्याविरोधात कट असल्याचा आरोपही राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केला. बंड केल्यानंतर प्रकरण उकरून काढलं असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rahul Shewale: बलात्काराच्या आरोपाप्रकरणी खासदार राहुल शेवाळेंची एसआयटी चौकशी करा; विधान परिषद उपसभापतींचेआदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
Embed widget