एक्स्प्लोर

मोठी बातमी : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही!

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मेरिट नुसारच निकाल - 

राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. 

14 फेब्रुवारी रोजी सुनावणी - 

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर लवकरच निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर सर्व आमदारांची उलटतपासणी पार पडली आहे. आता 14 फेब्रुवारी रोजी राहुल नार्वेकर एतिहासाकि निकाल देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता आहे.

पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे - 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार यांना दिला. त्यामुळे अधिकृतरीत्या राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेला आहे. आता अशा परिस्थितीत शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यानंतर शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

पक्ष कार्यलयावरून संघर्ष पाहायला मिळणार? 

शिवसेनेत झालेल्या गटबाजीनंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. त्यामुळे पुढे दोन्ही गटात अनेक मुद्यावरून वाद पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज्यभरातील पक्षाचे कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटात संघर्ष देखील पाहायला मिळाला. आता राष्ट्रवादीत देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील अनेक महत्वाच्या शहरात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून, ते आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटासह शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आणखी वाचा :

NCP Crisis : सूर्यफूल, चष्मा ते उगवता सूर्य, शरद पवार गटाकडून नव्या चिन्हांची चाचपणी, कोणतं चिन्ह फायनल होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 29 मार्चABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Embed widget