एक्स्प्लोर

Rahul Narwekar : आदित्य ठाकरेंचे जिवलग, फडणवीसांचा विश्वासू; शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी, कोण आहेत राहुल नार्वेकर?

Who Is Rahul Narwekar : आदित्य ठाकरेंचे जिवलग, फडणवीसांचा विश्वासू असणारे राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी असा झाला आहे.

Rahul Narwekar :  राज्यासह देशाचं लक्ष शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shiv Sena MLA Disqualification) निकालावर लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे  निकाल सुनावणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेमधून केली होती. आज त्याच पक्षाबद्दल ऐतिहासिक निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. 

शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी

राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेमधून झाला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही कार्यरत होते. राहुल नार्वेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. इंग्रजी वृत्तवाहिन्यांमधील चर्चात्मक, वादविवाद कार्यक्रमात राहुल नार्वेकर हे शिवसेनेची बाजू मांडत असे. एकप्रकारे ते न्यूज डिबेटमध्ये शिवसेनेचा चेहरा होते. 

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती... 

राहुल नार्वेकर यांनी 2014 च्या सुमारास शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून विधान परिषदेला नकार दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी चर्चा होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुढे राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात कामगिरी बजावली. 
 
2014  ते 2019  या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात नार्वेकर यांना ‘उत्कृष्ट भाषणा’साठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा पुरस्कार मिळाला. त्यांनी मे 2016 मध्ये राष्ट्रकूल संसदीय मंडळ शाखेद्वारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड  आणि सिंगापूरचा अभ्यास दौराही केला.

भाजपमध्ये प्रवेश... 

2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. भाजपने त्यांनी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत 57 हजार 420 मते मिळाली, त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा (41 हजार 225 मते) यांचा पराभव केला.

राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला.  

नार्वेकरांची राजकीय पार्श्वभूमी...

राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तर, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळेस नगरसेवक आहेत. तर, त्यांची मेहुणी हर्षतादेखील मुंबई महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaPetrol-Disel Price : पेट्रोल डिझेलचा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातला दर घटवला ABP MajhaMaharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर; महिला, शेतकरी, युवकांसाठी मोठ्या घोषणाWadettiwar On Pune Drugs : कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, विजय वडेट्टीवार सभागृहात आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
Embed widget