एक्स्प्लोर
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्रात, मुंबई, धुळ्यात सभा होणार
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी निश्चित झाली आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबई आणि धुळ्यात रस्त्यांच्या दुतर्फा काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधींचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई आणि धुळ्यात राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ही सभा महत्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
धुळ्यात राहुल गांधी यांची सभा दुपारी 2 वाजता होणार आहे. तर मुंबईत संध्याकाळी 5 वाजता बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी निश्चित झाली आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबई आणि धुळ्यात रस्त्यांच्या दुतर्फा काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधींचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.
धुळ्यात सभा सभास्थळापासून अवघ्या काही अंतरावर परीक्षा केंद्र
धुळ्यात राहुल गांधी यांची आज दुपारी 2 वाजता शहरातील एसएसव्हीपीएस कॉलेजच्या प्रांगणात सभा होत आहे. या सभेला राहुल गांधी यांच्या समवेत मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, हे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सभास्थळी आलिशान बंदिस्त मंडप टाकण्यात आलाय आहे. सभेनिमित्त वाहतुकीच्या मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.
या सभास्थळापासून अवघ्या काही अंतरावर परीक्षा केंद्र आहे. आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. सभा स्थळापासून अवघ्या काही अंतरावर बारावी, दहावीचं परीक्षा केंद्र आहे. परिणामी सभेनिमित्त लावण्यात आलेल्या भोग्यांमुळे परीक्षार्थींना व्यत्यय येऊ शकतो, असे बोलले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement