एक्स्प्लोर
कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 40 कर्मचारी क्वारंटाईन
31 मार्चला मालवणीमध्ये राहणारा 65 वर्षीय कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना, रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
मुंबई : मुंबईतील कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात काम करणाऱ्या एकूण 40 कर्मचाऱ्यांना कांदिवलीच्या (ESIC ) कामगार रुग्णालयात क्वारंटाईन केले गेले आहे. शताब्दी रुग्णालयात काम करणारे हे 40 जण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 31 मार्चला मालवणीमध्ये राहणारा 65 वर्षीय कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना, रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
या मालवणीमध्ये राहणाऱ्या 65 वर्षीय रुग्णाला 26 मार्चला शताब्दी रुग्णलायत किडनीच्या आजारावर उपचारासाठी आणण्यात आले होते. नंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात डायलिसीसाठी नेण्यात आले. 28 मार्च दरम्यान या रुग्णाची तब्येत आणखीच खालावली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना एका खाजगी लॅबोरेटरीमध्ये या रुग्णाची कोविड -19 टेस्ट करण्यात आली आणि हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील 8 जणांची सुद्धा कोविड 19 टेस्ट करण्यात आली आहे आणि त्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. मालवणी पोलिसांनी हा रुग्ण राहत असेलला परिसर सील करून बाजूचे दुकान सुद्धा बंद केले आहे.
#GoCoronaGo | कोरोनाशी लढण्याच्या डॉ. रामदास आठवलेंच्या आयडिया! आठवलेंचा लॉकडाऊन दिनक्रम काय?
31 मार्चला या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 1 एप्रिलपासून त्याच्या संपर्कात आलेल्या शताब्दी रुग्णलयातल्या 40 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर खासगी रुग्णलायत ज्या ठिकाणी या रुग्णाला उपचारासाठी ठेवण्यात आले आणि त्या ठिकाणी जे जे या रुग्णाच्या संपर्कात आले त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. या आधी सुद्धा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हिंदुजा रुग्णलायतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असताना त्या ठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टर, नर्स व इतर हेल्थ वर्कर्सला क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. एक खबरदारी म्हणून आणि हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनेक रुग्णालय अशाप्रकारे क्वारंटाईन राहण्याचे सांगत आहे.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement