एक्स्प्लोर
तूर खरेदीची मुदत आणखी सात दिवस वाढवली, शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : तूर खरेदी करण्याचं जे उद्दीष्ट होतं, त्याची तारीख 15 एप्रिल ठरवण्यात आली होती. त्यामुळे नाफेडने तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र शेवटपर्यंत तूर खरेदी केली जाईल, शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावं, असं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
‘नाफेड’ने 15 एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नसल्याचं पत्र जारी केलं आहे. 16 एप्रिलपासून तूर खरेदीची कोणतीच जबाबदारी आपली राहणार नसल्याचं म्हटलं नाफेडने पत्रात म्हटलं आहे.
मात्र तूर खरेदी करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 22 एप्रिलपर्यंत तूर खरेदी केली जाईल, असं सुभाष देशमुख यांनी सांगितलं.
आतापर्यंत 34 लाख टन तुरीची खरेदी झाली आहे. ही गेल्या 15 वर्षातील विक्रमी खरेदी आहे. येत्या काळातही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत तूर खरेदी करु, असं सुभाष देशमुख म्हणाले.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या फक्त अर्ध्या तूरीची विक्री झाली आहे. अजूनही अर्धी तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता होती.
संबंधित बातमी :
15 एप्रिलनंतर तूर खरेदी बंद, 'नाफेड'चं पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement