एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील चौकाचौकात पुणेरी पाट्या
पुणे: नोटबंदीच्या निर्णयानंतर व्हॉट्स अॅप, फेसबुक असेल किंवा ट्विटरसारख्या सोशल मीडियावर जोक्सचा आक्षरशः भडीमार सुरु आहे. सोशल मीडियावरील हेच जोक आता पुण्यातील चौकाचौकांमध्ये 'पुणेरी पाट्या' म्हणून दिसू लागल्या आहेत.
पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये, चौकांत किंवा बस स्टॉपवरती सर्वत्र या पाट्या पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांना चर्चेसाठी जगातील कोणताही विषय वर्ज्य नसतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने नक्की काय करायला हवं, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय, अंटार्टिकावरचं वातावरण कसं बदलतंय या अशा विषयांबद्दल पुणेकरांची ठाम अशी मतं असतात. आता तर विषय नोटबंदीचा आहे. मग पुणेकर मागं कसं राहतील? शक्य तरी आहे का ? पण आता या चर्चांनी पुणेरी पाट्यांचं रुप घेतलं आहे.
पुण्यात कालपर्यंत चर्चा होती ती नोटबंदीची, पण आता चर्चा सुरु आहे ती नोटबंदीच्या निर्णयावर. खास पुणेरी पद्धतीनं टोमणा मारणाऱ्या पाट्या सर्वत्र दिसत आहेत.
पुण्यातील सदाशीव, नारायण, शनिवार,कसबा, रविवार, सर्वच पेठांमध्ये या पुणेरी पाट्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या पाट्या अशा खुबीनं लावण्यात आल्या आहेत की रस्त्याने जाणाऱ्या कोणाच्याही चटकन नजरेस पडाव्यात.
पाट्यांवरचा मजकूर तीन प्रकारचा आहे आणि तिन्ही प्रकारच्या पाट्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाची अगदी पुणेरी पद्धतीनं खिल्ली उडवण्यात आली आहे.
ज्यांना लिहता - वाचता येत नाही अशांनाही या पाट्यांवर नोटांबद्दल काहीतरी लिहलंय हे ध्यानात येतंय.
पण पुणे म्हटलं की वाद हा आलाच. एखाद्याने एक मत मांडलं की त्याच्या विरुद्ध मतं इथं तयार असतंच. मोदींच्या निर्णयावर कोणी टीका करतंय असं पाहिल्यावर, त्यावर तुटून पडणारे आणि या पाट्यांचीच टर उडवणारे इथं लगेच, अगदी त्याच चौकात भेटतात .
एखादी गोष्ट आपल्याला पटलेली नाही हे सांगण्यासाठी किंवा एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून देण्यासाठी पुणेकरांची एक विशिष्ट पद्धत आहे.
आता हेच पाहा ना, पुण्यातील नारायण पेठेतील मोदी गणपती समोरच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण सुरु आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे हे सांगणाऱ्या फलकावर पंतप्रधान मोदींचा फोटो इथं छापण्यात आला आहे.
पाईपलाईन बदलण्यासाठी लावलेल्या फलकावरही तेच, पण सध्या आघाडीवर आहे ती नोटाबंधीच्या निर्णयावरची चर्चा. चहाच्या टपऱ्यांवर, हॉटेल्समध्ये, बघावं तिकडं चर्चा नोटा बंदीचीच.
दोन माणसं जर एकमेकांशी तावातावने बोलत असतील, तर हमखास समजावं की त्यांच्यात नोटबंदीबद्दल चर्चा सुरु आहे.
पुण्यात पुणेरी पाट्या तुम्हाला शोधाव्या लागत नाहीत. त्या आपोआप तुम्हाला भेटतात आणि न मागता सल्लाही देतात. आपला सल्ला कोणी ऐकेल की नाही याची खात्री नसली तर पुणेकर चक्क पाटी रंगवून चौकात लावण्यासही मागं पुढं पहात नाहीत .
पुण्यातल्या चौकाचौकांमध्ये पुणेरी पाट्या पाहायला मिळतात. टिळक रस्त्यावर दुर्वांकूर डायनिंग हॉलच्या बाहेर एक पाटी तयार करण्यात आली आहे. अगदी ऑइल पेंटमध्ये तयार करण्यात आली आहे.
तर या अशा पुणेरी पाट्यांमध्ये आता नोटबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडवणाऱ्या पाट्यांचीही भर पडली आहे.
खरं तर नोटबंदीचा निर्णय होऊन अजून पंधरा दिवसही झालेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर पन्नास दिवस थांबण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अशा आणखीही पुणेरी पाट्या पुण्याच्या गल्ली बोळात दिसण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
मुंबई
राजकारण
Advertisement