पुण्यात बुलेट राजांवर कारवाई, फटाका सायलेंसर लावून फिरणाऱ्या दुचाकी जप्त, गॅरेजवर सुद्धा कारवाई
Pune : पुण्यात पोलिसांनी दुचाकीस्वरांवर कारवाई केली आहे. फटाका सायलेंसर लावून फिरणाऱ्या बुलेट राजांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Pune : पुण्यात पोलिसांनी दुचाकीस्वरांवर कारवाई केली आहे. फटाका सायलेंसर लावून फिरणाऱ्या बुलेट राजांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मॉडिफाय करुन सायलेंसर बसवून देणाऱ्या गॅरेजवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी फटाका सायलेंसर लावणाऱ्या दुचाकीस्वार यांच्याकडून वाहने देखील जप्त केली आहेत. पुण्यातील वारजे माळवाडी इथं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
15 बुलेट दुचाकी चालकांविरुध्द वाहतूक विभागाच्या मदतीने कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागात बुलेट दुचाकी गाड्यांना मॉडिफाय केलेले व फटाके वाजवणारे सायलंसर बसवून ध्वनीप्रदुषण निर्माण करणारे दुचाकीचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यावरुन वारजे माळवाडी पोलिसांनी मॉडिफाय केलेले व फटाके वाजवणारे सायंलसर लावून फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरुध्द कारवाई केली. या कारवाई दरम्यान 15 बुलेट दुचाकी चालकांविरुध्द वाहतूक विभागाच्या मदतीने कारवाई करुन दुचाकींचे सायलंसर जप्त केले आहेत. तसेच कारवाई केलेल्या दुचाकीचालकांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचे मॉडिफाय केलेले सायलंसर हे वारजे येथिल रॉयल बाईक सर्विस या गॅरेजमधून बसविले असल्याचे सांगितले. यावरुन गॅरेजचे मालक योगेश दामोदर सपकाळ हा बुलेट मोटारसायकलला मॉडिफाय केलेले व फटाके वाजवणारे सायलेंसर त्याच्याकडून मिळून आल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Parbhani News : वाळू माफियांची दादागिरी गावकऱ्यांनी उतरवली, हायवासह दुचाकी फोडल्या; परभणीच्या पाथरीत खळबळ!
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या






















