एक्स्प्लोर
पुण्यात एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारली
पुणे : महापालिका प्रचारासाठी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींच्या प्रचार सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील एमआयएम उमेदवार जुबैर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी 14 फेब्रुवारीला सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सभेचं ठिकाण हे संवेदनशील भाग असून या ठिकाणी विविध पक्षांच्या प्रचार सभा आणि रॅली सुरु आहेत. ओवेसींचं भाषण हे प्रक्षोभक आणि जातीवाचक असून त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सभेला परवानगी नाकारण्यात येत आहे, असं पोलिसांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
एमआयएमला सभेसाठी आता दुसरं ठिकाण शोधावं लागणार आहे. त्यामुळे एमआयएमकडून सभेसाठी कोणती पर्यायी जागा निवडली जाते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्यासह 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
https://twitter.com/asadowaisi/status/830718637744861184
दरम्यान ओवेसींनी परवानगी नाकरल्याने नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी पुण्यात रॅली झाली, ती शांततेत पार पडली. मुंबईतही दोन सभा शांततेत झाल्या. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement