एक्स्प्लोर

Streets4People Challenge : पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील चार शहरांचा केंद्राकडून गौरव  

Streets4People Challenge : 'स्ट्रीट्स फॉर पीपल' चॅलेंजच्या 11 विजेत्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांचा समावेश

Citizen friendly initiatives : पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांचा केंद्राकडून गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं 'स्ट्रीट्स फॉर पीपल' चॅलेंज (Streets4People Challenge ) अर्थात जनतेसाठी पदपथ या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेअंती 11 शहरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 4 शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचे प्रस्ताव दाखल झाले होते.

शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष 2006 मध्ये राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील लागू करण्यात आले होते. त्याच शिफारसींच्या धर्तीवर 2020 पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात. ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली आहे. या स्पर्धेत यंदा महाराष्ट्रातील चार शहरांनी बाजी मारली आहे. या सर्व शहरांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेण्यात आली.

पुणे   - 
पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणण्यात आली.

पिंपरी-चिंचवड - 
पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर करण्यात आली. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.

औरंगाबाद - 
रस्त्यांचा वापर कारसारख्या वाहनांऐवजी नागरिकांना मुक्तपणे वापरू देण्यासाठी सर्व सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणण्यात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन यशस्वी ठरले. मोकळ्या रस्त्यांना सुशोभित करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात, रस्त्यांच्या कडेला विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच चालणाऱ्या आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय करणे असे उपक्रम प्रशासनाने राबविले.

नागपूर -
नागपूर शहरातील सीताबर्डी  आणि साक्कदरा या अत्यंत गर्दीच्या बाजारांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहर प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. शहरातील रस्त्यांच्या लगत विविध रंग वापरून चित्रे, जुने टायर वापरून बसण्याची ठिकाणे तसेच टाकाऊ धातूच्या वस्तूंपासून नव्या पदपथांची सीमा आखणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि इतर संबंधितांची मदत घेण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget