काय? पुणेकरांनी या ही वर्षी विदेशी मद्य पिण्यात मुंबईला मागे टाकलंय...
पुणेकर 185.24 लाख लिटर विदेशी मद्य प्यायलेत. पुणेकरांमुळे विदेशी मद्य पिण्यात मुंबईकर मागे पडले असून मुंबई उपनगरकरांनी 170.05 लाख लिटर विदेशी प्यायले आहे.
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार याही वर्षी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, पुणेकर मुंबईकरांपेक्षा काही कमी नाहीत. कोरोना महामारीचा काळ तसेच लॉकडाऊन असतानाही याही वर्षी पुणेकरांनी व्हिस्की पिण्यात मुंबईला मागे टाकले दिला आहे.
2020 या वर्षात सर्वच क्षेत्रांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलंय. पण मद्य बनवणे आणि पिणे या क्षेत्राला कोरोनाही काहीच करु शकला नाही. राज्याच्या अर्थ व्यवस्थेचा महत्वाचा घटक ... असच म्हणावं लागेल कारण कोरोना सारखी महामारी आणि लॉकडाऊन असून सुद्धा या मद्य पिणा-या अर्थ व्यवस्थेच्या महत्वाच्या घटकांमुळे राज्याच्या तिजोरीत भर भरुन पैशांचा पाऊस पडला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगते ज्यामध्ये बाजी पुणेकरांनी मारली आहे. फक्त विदेशी मद्य पिण्यात पुणेकरांनी 2020 या वर्षभरात नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्वांना मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे.
पुणेकर 185.24 लाख लिटर विदेशी मद्य प्यायलेत. पुणेकरांमुळे विदेशी मद्य पिण्यात मुंबईकर मागे पडले असून मुंबई उपनगरकरांनी 170.05 लाख लिटर विदेशी प्यायले आहे. तर पुणे मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनीही 144.71 लाख लिटर विदेशी मद्य प्यायले आहेत. सर्वात कमी विदेशी मद्य सिंधुदुर्गकरांनी प्यायले ते म्हणजे फक्त 3.08 लाख लिटर विदेशी मद्य सिंधुदुर्गकर प्यायले आहेत.
फक्त विदेशी मद्य नाही तर बीअर आणि वाईन पिण्यातही पुणेकारांनी मुंबईसह सर्वांना मागे टाकलय.वर्षभरात पुणेकांरांनी 170.75 लाख लिटर बीअर फस्त केली आहे. तर 157. 97 लाख लिटर बीअर उपनगरीय मुंबईकर प्यायले आहेत. तर 146.66 लाख लिटर बीअर उपनगरीय मुंबईकर प्यायलेत तर सर्वात कमी बीअर फक्त 3.78 लाख लिटर बीअर हिंगोलीकर प्यायले आहेत.
याच बरोबर 7.59लाख लिटर वाईन पुणेकर प्यायले आहेत. 7.20 लाख लिटर वाईन उपनगरीय मुंबईकर प्यायले आहेत. तर सर्वात कमी वाईन म्हणजे ०.००5 लाख लिटर वाईन गोंदिया आणि हिंगोलीकर प्यायले आहेत.
विशेष म्हणजे राज्याच्या उप राजधानीत सर्वात जास्त देशी मद्य प्यायलं गेलं आहे. 150.47 लाख लिटर देशी मद्य नागपूरकर प्यायले आहेत. 146.42 लाख लिटर देशी मद्य पुणेकर प्यायले तर 126.42 लाख लिटर देशी मद्य नाशिककर प्यायले आहेत. फक्त 5.88 लाख लिटर देशी मद्य सिंधुदुर्गकर प्यायले आहेत.
राज्याला फायदा झाला का?मद्य विक्रीचा राज्य सरकारचा चांगला फायदा झाला आहे. तो म्हणजे अपेक्षा नसताना ही राज्याला मद्य विक्रीतून तब्बल 7 हजार 776.66 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यावेळेस मात्र पुणेकर मागे राहिले असून औरंगाबादकरांनी राज्याच्या महसूलात हातभार लावत मद्य विक्रीतून राज्याला तब्बल 1 हजार 837.81 कोटी रुपये महसूल मिळवून दिला आहे. तर नाशिकरांनी मद्य विक्रीतून राज्याला 1 हजार 814.53 कोटी रुपये महसूल मिळवून दिला आहे. पुणेकरांनी मद्य विक्रीतून राज्याला 1 हजार 019.78 कोटी रुपये महसूल राज्याला मिळवून दिलाय तर वाशिमकरांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 1 कोटी 61 लाख रुपये मद्यविक्रीतून राज्याला म्हणून मिळवून दिला आहे.
महामारीच्या काळातही अवैध मद्य विक्री जोरात सुरु होती. कोरोना काळात तब्बल 32 हजार 238 अवैध विक्रीचे गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे या कारवाईत 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. 19 हजार 462 अवैध मद्यविक्री करणा-यांना उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. तर अवैध मद्यविक्री करता वापरण्यात आलेल्या 2 हजार 663 गाड्या देखील उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी ही माहिती दिली आहे.राज्यात लॉकडाऊनच्या शेवटी मद्य खरेदी विक्रीस राज्य सरकारने परवानगी दिली. त्यावेळेस विरोधकांसह नागरिकांनीही सरकारवर टीका केली. पण त्या टीकांना खरे उत्तर मद्य खरेदी विक्रीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत पडलेल्या पैशांच्या पावसाने दिले आहे.